नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरून संवाद साधला. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते या वेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली हे त्रिसदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
Check Also
अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’
आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …
RamPrahar – The Panvel Daily Paper