पिंपरी : प्रतिनिधी
सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अहोरात्र झटणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. आकुर्डीतील या प्रेमामुळे बारणे यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
शिवसेना,भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 28) आकुर्डी परिसरात भेटीगाठी दौरा केला. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाला खासदार बारणे यांनी भेट दिली. त्या वेळी ज्येष्ठांनी त्यांना पुन्हा एकदा विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. आकुर्डी येथील भेटीगाठी दौर्यात आमदार गौतम चाबुकस्वार, सल्लागार मधुकर बाबर, शहराध्यक्ष योगेश बाबर, पिंपरी-चिंचवड शहर संघटक उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, पिंपरी विधानसभा संघटक सरिता साने, उपविभाग संघटक शैला पाचपुते, विभागप्रमुख शैला निकम, सुभाष जैन, ज्येष्ठ नागरिक उत्तम कुटे, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, किसन देशमुख आदी उपस्थित होते.
