Friday , September 22 2023

मुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी

सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या ढिगार्‍याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.

 या दुर्घटनेमुळे परिसरातील  मार्ग बंद करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.  मदतकार्य सुरू केले आहे. जेसीबीने ढिगारा उपसला जात आहे.

सीएसएमटी स्थानकात जाण्यासाठी आणि तिथून बाहेर पडणार्‍यांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. अंजुमन इस्लाम शाळेच्या बाहेर हा पूल आहे. मुंबई महापालिकेचे मुख्यालयही त्याच मार्गावर आहे. दरवर्षी याची डागडुजी करणे महत्त्वाचे असते, पण हे काम पूर्ण न झाल्याचेही कळते. जुन्या पुलांच्या यादीत हा पूल असल्याचे सांगण्यात येत आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई,खा.अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित,आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची  पाहणी करुन जखमींची विचारपूस केली.गर्दीच्या वेळी अचानक पुलाचा मधला भाग कोसळल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींवर  जीटी,सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 या पुलाकडील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी येथील वाहतूक क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने वळवण्यात आली. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply