कामोठे : रामप्रहर वृत्त
कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रक्तासाठी सर्वसामान्य जनतेची होणारी धावपळ पाहून कामोठ्यातील दिशा महिला मंच आणि झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने सुषमा पाटील विद्यालय कामोठे येथे रविवारी (दि. 11) एमजीएम हॉस्पिटल ब्लड बँक कामोठे रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग्य ती काळजी घेऊन 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या वेळी दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे, झेंडा सामाजिक संस्थेचे संस्थापक अशोक राघो पावणेकर, अध्यक्ष जय पावणेकर तसेच रक्तपेढीचे अधिकारी राजेश अत्तरडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरीत्या झाला. उपक्रमामध्ये दिशाच्या हिरकणी विद्या मोहिते, रेखा ठाकूर, उषा डुकरे, अपर्णा कांबळे, ललिता इन्कर, मोहिनी पुजारी, खुशी सावर्डेकर, दिपाली खरात तसेच प्रथमेश कानागल, अमोल कड, राकेश बारस्कर, अमित गुटुकडे, तुषार हिरवे, मिलिंद पाटील, अरुण पावणेकर, प्रशांत कुंभार, राज पावणेकर, जगदीश पावणेकर, विशाल पावणेकर झेंडा सामाजिक संस्थेचे शिलेदार यांच्या सहकार्याने हा उपक्रम सामाजिक भावनेचे दर्शन घडवून यशस्वीरीत्या झाला.