Breaking News

गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे बांधकामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण-कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर भिंत बांधण्यात येणार आहे. या बांधकामाचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 19) शुभारंभ करण्यात आला.
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज येथील टेरेसवर ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाच्या शुभारंभ समारंभास पनवेल पंचायत समितीच्या सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत,
गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, अरुण कोळी, भाजप नेते विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, भाऊ भोईर, किशोर पाटील, रवी भोईर, ज्योत्स्ना ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply