Breaking News

नवनिर्वाचीत सभापतींना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ऑनलाइन पद्धीतीने बुधवारी निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणूकीत स्थायी समिती स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर, प्रभाग समिती सभापती पदी अनीता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर आणि सुशीला घरत निवडून आले आहेत. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या नवनिर्वाचीत सभापतींची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक शत्रृघ्न काकडे, अभिमन्यू पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका राजेश्री वावेकर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल,  सचिन पाटील, दिपक शिंदे, वासुदेव पाटील, चिन्मय समेल, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहीत जगताप, गौरव कांडपीळे, अभिषेक भोपी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस

रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …

Leave a Reply