Breaking News

…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे

सातारा : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे बोलले जाते. आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. सातार्‍यात झालेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे असे सांगतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करू नये, असे शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करू नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असे सांगून मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असे बोलले जाते. मराठा समाजात दुफळी असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply