Breaking News

पंतप्रधानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

म्हसळा ः प्रतिनिधी

देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भाजप म्हसळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे देशातील 135 कोटी जनतेचे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भाजप सबंध देशभर आनंद उत्सव साजरा करीत आहे.

कोरोना महामारी तसेच चक्रीवादळात तालुक्यातील अनेक नागरिकांचे हाल झाले. अशा वेळी अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस व काही डॉक्टर दिवसरात्र कोविड योद्धा म्हणून जनतेची सेवा करीत आहेत. त्यांचा सन्मान व गरीब, गरजूंना अन्नधान्य किट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते कृष्णा कोबनाक व तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांनी केले होते. या वेळी सरचिटणीस महेश पाटील, तालुका सरचिटणीस सुनील शिंदे, शहर अध्यक्ष संतोष पानसरे, तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष समीर धनसे, मनोहर जाधव, दिनेश काप, योगेश महागावकर, सुबोध पाटील, शरद कांबळे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply