Breaking News

काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदील

रेवदंडा ़़: प्रतिनिधी

ऐन दिवाळीनिमित्त बाजारात विविध आकाराचे रंगीबेरंगी आकर्षक  आकाश कंदिल  विक्रीस आले आहेत. चौलच्या राकेश काठे यांनी काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदिल बनविले असून त्यांनी ग्राहक राजाला आकर्षीत केले आहे. चौलच्या भाटगल्लीत राहणार्‍या राकेश काठे यांनी काथ्याच्या दोरीचे नक्षीदार विणकाम करुन पर्यावरण पुरक, टिकाऊ व आकर्षक असे आकाश कंदिल तयार केले असून, ते सोशल मीडियाव्दारे ग्राहकांना सादर केले आहेत. ग्राहकांनीही या आकाश कंदिलास पंसती दर्शविली आहे. अनेकांनी काथ्यापासून बनविलेल्या आकर्षक आकाश कंदिलाची मागणी केली आहे.  इतर आकाश कंदिलापेक्षा काथ्यापासून बनविलेले आकाश कंदिल तयार करण्यासाठी भरपूर वेळ लागतो, त्यासाठी काथ्यातून विशिष्ट प्रकारचे विणकाम करावे लागते. एक आकाश कंदिल बनविण्यासाठी सात ते आठ तासाचा अवधी लागतो. हे आकाश कंदिल पर्यावरण पुरक, इंकोफे्रडली आहेत, शिवाय टिकावू असल्यामुळे ते दोन – तीन वर्षे वापरू शकतो, असे राकेश काठे यांनी सांगितले. काथ्यापासून बनविलेले आकाश कंदिल ग्राहकांचे लक्ष आकर्षित करीत असून राकेश काठे यांनी काथ्यापासून तयार केलेल्या या आकाश कंदिलांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply