पनवेल : रामप्रहर वृत्त
होप मिरर फाऊंडेशनने नुकतीच पहिली महिला सशक्तीकरण मोहीम राबविली. या वेळी यशस्वीरित्या नवी मुंबई आणि मुंबईत अनेक उपक्रम राबवित 300हून अधिक कुटुंबांना मदत करण्यासाठी, त्यांच्या कार्यसंघाने महिला सशक्तीकरण उपक्रमांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मोहिमेस महिलांचा चांगलाप्रतिसाद मिळाला. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे, जी गरजूंना मदत करण्याची मानसिकतेने चालविली जाते. या संस्थेने 9 नोव्हेंबर रोजी पनवेलच्या गाढेश्वर येथे महिला सशक्तीकरण अभियान चालवले होते. या मोहिमेचा हेतू शिक्षण, प्रचार आणि सॅनिटरी पॅडचे वितरण करणे हा होता. या उपक्रमात यास्मीन कच्ची, रुबिना खान, वृषाली राठोड आणि स्नेहा त्रिपाठी यांनी नेतृत्व केले.
आम्हाला महिला सबलीकरण टीम सुरू करायची होती आणि प्रत्येकाकडून मिळालेला पाठिंबा आणि देणगी यामुळेच हे शक्य झाले. आम्हाला फक्त आपला पाठिंबा हवा आहे. संस्थेचा हेतू साध्य करण्यासाठी आम्ही बरेच काही करू शकतो. -रमझान शेख, संस्थापक