Breaking News

राष्ट्रीय आयुर्वेद दिन पनवेलमध्ये उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जोशी पंचकर्म क्लिनिकच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोशी पंचकर्म क्लिनिकच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉ. ज्योती आनंद जोशी यांनी कोरोना काळात केलेल्या सेवाकार्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

जोशी पंचकर्म क्लिनिकच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉ. ज्योती आनंद जोशी यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांवर महामारीच्या काळात केलेल्या यशस्वी उपचारांबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. ज्योती जोशी यांनी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत नुकताच त्यांना कोविड रिसर्च ऑन आयुर्वेदसाठी पद्मश्री पी. आर. कृष्णकुमार यांच्यातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांचा शोधनिबंध केस रिपोर्ट ऑफ कोविड 19 पेशंट विथ हायपोस्कीया हा आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ आयुर्वेदा अ‍ॅण्ड इंटीग्रेटिव्ह मेडीसीनमध्ये प्रकाशित झाला आहे. देशातून आयुर्वेद आणि कोविडवरील हा पहिला शोध निबंध आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादासााठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

अमेरिकेत झालेल्या जागतिक आयुर्वेद परिसंवादासाठी त्यांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या शोध निबंधासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सोहळ्यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका रुचिता लोंढे, माजी नगरसेविका नीता माळी, पवन सोनी, दीपक सोनी, आनंद जोशी, शैलेश जोशी, आशिष जोशी, सचिन जोशी, मनीष जोशी आदी उपस्थित होते.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply