Breaking News

चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्त करा; अन्यथा आंदोलन

पनवेल भाजप युवा मोर्चाचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल-माथेरान मार्गावरील चिपळे पूल ते नेरे येथील टप्प्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी रस्त्याची डागडुजी करावी; अन्यथा भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांना दिला निवेदनाद्वारे

दिला आहे.

चिपळे पूल ते नेरेदरम्यान नागरिकांना रोजच्या दळणवळणासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांनाही तारेवरची कसरत करून वाहने चालवायला लागत आहेत. सततच्या त्रासामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. त्या पाहता कार्यवाही करावी, असे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत माहितीसाठी आमदार प्रशांत ठाकूर, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील व राज पाटील यांना देण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply