Breaking News

अंबा नदीतील अडथळ्यांचे खडक होणार दूर

नागोठणे : प्रतिनिधी

शहरातील गणेश विसर्जनाचा मुख्य सोहळा दरवर्षी येथील अंबा नदीवर होत असतो. या ठिकाणी असलेल्या  पुलाच्या पायथ्याशी काही वर्षांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. ते उखडून पसरले असल्याने मूर्ती विसर्जन करताना गणेशभक्तांना त्रास सहन करावा लागत होता. नागोठणे ग्रामपंचायतीने सोमवार (दि. 23) पासून हे काँक्रीटचे खडक कॉम्प्रेसरने फोडण्याच्या कामाला सुरुवात केली. नदीतील अडथळे दूर झाल्यामुळे सन 2021 चा गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास सरपंच डॉ. धात्रक यांनी व्यक्त केला.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply