Breaking News

आठवडा बाजारावरही उष्म्याचा परिणाम

पेण : प्रतिनिधी सध्या मार्च-एप्रिल असे कडक उन्हाचे महिने असतात. या महिन्यांमध्ये सूर्याची उष्णता महाराष्ट्रासहीत रायगड जिल्ह्यातही 39 अंश से.पेक्षा अधिक वाढू लागली आहे. सकाळी 9 नंतरच कडक उन्हाला सुरुवात होत आहे. दुपारी 12 नंतर तर उन्हात कामानिमित्त अथवा खरेदीसाठी बाजारात फिरता येत नाही. पुढील दोन महिन्यांनंतर पावसाळ्याला सुरुवात होणार असून, नागरिकांची पावसाळ्यापूर्वींची खरेदी या दोन महिन्यात होत असते. यासाठी सर्वांत मोठा आधार आठवडे बाजार या दिवसात होत असतो. पेण तालुक्यातही वडखळ, वाशी गाव, आमटेम, अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ, आवास, किहीम, चोंढी, चौल आदी ठिकाणचे आठवडे बाजारात ग्राहक सध्या प्रचंड उन्हाच्या उष्णतेमुळे सकाळी लवकर घराबाहेर पडून दुपारी 12च्या आत खरेदी करून घरी पोहचत आहेत. सायंकाळी 4 नंतर खरेदी करण्यासाठी बाजारात बाहेर पडतात. या वेळेस बाजारात गर्दी दिसते. तर दिवसभर उन्हामुळे आठवडे बाजारात शुकशुकाट व मंदीचे वातावरण असते. या आठवडे बाजारात किरकोळ व्यापार्‍यांकडे मिळणार्‍या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला, सुकी मच्छी, कांदे, बटाटे, लसूण आदी मिळत असतात. राज्यात तापमानाने 37 ते 40 अंश से. पार केले आहे. बाजारात ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरात बसणे पसंत केले आहे. याचा फटका या आठवडे बाजाराला बसत आहे.  सरकारने शेतकरी ते ग्राहक   योजना आठवडे बाजाराच्या रूपात आणल्यामुळे स्वस्त दरात भाजीपाला मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply