पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी (दि. 26) नवे 141 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 102 व ग्रामीण 19) तालुक्यातील 121, पेण नऊ, खालापूर सहा आणि उरण, कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे.
नव्या रु ग् ण ा ंम ुळ ेजिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,703 आणि मृतांची संख्या 1602 झाली आहे. आतापर्यंत 54,006 जण कोरोनामुक्त झाल्याने 1095 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper