Friday , September 22 2023

पनवेलमध्ये आधार केंद्रावर फसवणूक; दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर

शहरातील साईनगर येथील आधार केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी संगनमताने बोटाच्या ठश्यांचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करून शासनाची व केंद्रावर येणार्‍या लोकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक करणार्‍या दोघांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. यातील आरोपी प्रितेश संभावडे व सुजल काथारा यांनी संगनमताने शॉप नं.5, गुरुपुष्प बिल्डींग साईनगर पनवेल येथे गुरुकृपा एंटरप्रायझेस या नावाने चालू असलेल्या आधार केंद्राच्या ऐनरोलमेंट सेंटर या ठिकाणी आपसात संनगमत करून स्वतःच्या फायद्याकरिता आधार सिस्टीमध्ये लॉगीन करण्याकरिता अधिकृत व्यक्ती असणारे सुजल काथारा याच्या बोटाच्या ठशाचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करीत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय जोशी, सहाय्यक निरीक्षक अमोल शिंदे, शिवाजी हुलगे, उपनिरीक्षक लाला लोणकर, दिपक पारध्ये यांनी व पथकाने या ठिकाणी छापा टाकून या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून क्रोजेंन्ट कंपनीचे फिंगरप्रिंट, बायोमेट्रीक डिव्हाइस, लॅपटॉप, प्रिंटर, वेब कॅमेरा, एक रबरी थम्स इंजेक्शन असा मिळून जवळपास 1,09,999 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply