Friday , September 22 2023

पंजाबचा दिल्लीवर विजय

मोहाली : वृत्तसंस्था

डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन याने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. पंजाबने 20 षटकांत दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र हे आव्हान त्यांना पेलता आले नाही. दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला. करनने 14 चेंडूत 11 धावा देऊन 4 बळी टिपले. त्यालाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात धडाकेबाज 99 धावांची खेळी करणारा पृथ्वी शॉ या सामन्यात शून्यावर बाद झाला. दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला अश्विनने झेलबाद केले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला आणि सातव्या षटकात दिल्लीला अर्धशतकी मजल मारून दिली. खेळपट्टीवर स्थिरावलेला अय्यर त्रिफळाचीत झाला. त्याने 22 चेंडूत 5 चौकारांसह 28 धावा केल्या. काही वेळातच धवनदेखील बाद झाला. धवनने 25 चेंडूंत 30 धावा केल्या. त्यानंतर पंत आणि इन्ग्रॅम यांनी डाव सावरला, मात्र थोड्या वेळात जमलेली जोडी फुटली. यानंतर दिल्लीच्या डावाला गळती लागली. आव्हानाचा पाठलाग करता दिल्लीची एकेकाळी 3 बाद 144 अशी मजबूत स्थिती होती, मात्र त्यानंतर सहज जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला.

त्याआधी, पंजाबच्या संघाने ख्रिस गेलच्या जागी सॅम करन याला सलामीला पाठवले, मात्र हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. तो 10 चेंडूंत 20 धावा करून पायचीत झाला. धडाकेबाज सुरुवात करणारा लोकेश राहुलही 15 धावा करून पतरला. मयंक अग्रवाल सर्फराझ खानशी झालेल्या गोंधळामुळे धावबाद झाला. पाठोपाठ सर्फराझही बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना मनदीप सिंगने 21 चेंडूंत नाबाद 29 धावांची उपयुक्त खेळी केली.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply