मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
पेण : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पर्यटकांनी नाताळ आणि थर्टीफर्स्टसाठी समुद्र किनार्यांसह अन्य पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण रामवाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने होत्या. परिणामी वाहतूक कोंडी झाली.
नाताळ आणि थर्टीफर्स्ट जवळ आल्याने अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह कोकणात फिरायला जाण्यास सुरुवात केली आहे. सलग चार दिवस सुटी असल्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे येथून येणार्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. त्याची झलक बुधवारी (दि. 23)पहावयास मिळाली.
महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असून, काही वेळेला अवजड वाहने अचानकपणे बंद पडतात. त्यामुळे कोकणात जाणार्या पर्यटकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवून आपल्यासह कुटुंबाची काळजी घ्यावी.
-रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा