Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये ‘दि फूड कंपनी’चे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि फुड कंपनी या दुकानाचा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला. पनवेलमधील दोन तरुणांनी मिळून सुरू केलेल्या दि फूड कंपनी या दुकानाचे उद्घाटन करताना मला अत्यानंद होत आहे. दर्जेदार उत्पादने हे या दुकानाचे वैशिष्ट असून या दुकानाचे भागीदार अनिकेत सावंत व विक्रांत रामधरणे हेही दर्जेदार कुटूंबातील आहेत, असे गौरवोद्गार या वेळी परेश ठाकूर यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, उत्पादने दर्जेदार असतील तर व्यवसाय करणे सोपे होते. कारण दर्जेदार उत्पादनांना ग्राहक पसंती देतात आणि हे दुकान ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल यात शंका नसल्याचे सांगत तरुणांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेविका रुचिता लोंढे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पवन सोनी, तालुका पत्रकार संघ समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, सल्लागार दिपक महाडिक, उपाध्यक्ष केवल महाडीक, रवींद्र गायकवाड, संजय कदम, अकबर सय्यद, अरविंद पोतदार, विशाल सावंत, संतोष सुतार, ओमकार महाडिक तसेच सावंत रामधरणे यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply