Breaking News

बलात्कारी मेहबूब शेखविरुध्द भाजयुमोची औरंगाबाद येथे निर्दशने

पनवेल : वार्ताहर

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरुद्ध औरंगाबाद क्रांती चौक इथे जोरदार निदर्शने करण्यात आले.

नोकरीचे आमिष दाखवून ट्युशन घेणार्‍या महिलेवर नराधम मेहबूब शेख याने बलात्कार केला. महिना होऊन गेला तरी या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी विरुद्ध गुन्हा नोंदवायला पोलीस टाळाटाळ करत होती. शेवटी दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आणि याची वाच्यता झाली.

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांनी या महाबिघाडी सरकारची लक्तरे वेशीवर टांगली. सर्व स्तरावर हे महाबिघाडी सरकार अपयशी ठरली आहे. कुठल्याही ठोस उपाययोजना नाही की बलात्कारसारख्या गुन्ह्यावर गुन्हेगाराला कठोर शासन नाही. फक्त फुशारक्या मारण्यातच यांचा वेळ जातोय. जो पर्यंत पीडित महिलेला न्याय मिळत नाही आणि मेहबूब शेख या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला अटक होऊन कठोर शासन होत नाही, तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा हे आंदोलन यापुढे सुरूच ठेवणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे पीडितेला न्याय मिळवून देणारा की आपल्या आपल्या पदाधिकार्‍याची पाठराखण करणार, असा सवालही पाटील यांनी या वेळी उपस्थित केला.

तसेच या आंदोलनामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस प्रभारी भाजयुमो चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या आंदोलनाच्या वेळी नागरिक, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि भाजप महिला मोर्चाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply