Breaking News

पाकिस्तानविरुद्ध विल्यमसनचे द्विशतक

नव्या विक्रमालाही गवसणी

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांची अव्वलस्थानासाठी चालू असलेली स्पर्धा संपुष्टात आणून तो पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला. याचसोबत पाकिस्तानविरोधात सुरू असलेल्या कसोटीत त्याने दमदार द्विशतक ठोकले आणि नवा विक्रम आपल्या नावे केला.
केन विल्यमसनने हेन्री निकल्स याच्यासोबत 369 धावांची भक्कम भागीदारी उभारली. याचसोबत विल्यमसनने सलग तीन शतके ठोकत कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावांचा टप्पा गाठला. याआधी स्टीफन फ्लेमिंग (7172) आणि रॉस टेलर (7379) या दोघांनी न्यूझीलंडकडून सात हजार धावांचा टप्पा गाठला होता, पण विल्यमसनने सर्वांत कमी डावांत हा पराक्रम केला. विल्यमसनने 83 कसोटी सामन्यांत सात हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने 53.85च्या सरासरीने धावा काढत हा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 24 शतके आणि 32 अर्धशतके ठोकली आहेत. 251 धावा ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्याला स्वत:चाच विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र या डावात तो 238 धावांवर बाद झाला. 362 चेंडूंत 28 चौकारांसह त्याने ही खेळी केली. हेन्री निकल्स (157) आणि डेरल मिचेल (102) यांच्या दमदार शतकाच्या साथीने न्यूझीलंडच्या संघाने 6 बाद 659 धावांपर्यंत मजल मारली.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply