दमदार नेते के. के. म्हात्रे, उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविकांचे पती भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक आणि कामोठे परिसरातील शेकापचे वजनदार नेते के. के. म्हात्रे, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र जोशी, नगरसेविका शीला भगत यांचे पती भाऊ भगत, नगरसेविका हेमलता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी त्यांच्या समर्थकांसह बुधवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
मुंबईतील वरळी येथील ब्लू सी बँक्वेट येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर,
अनिल भगत, संजय भोपी, हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, सुशीलकुमार शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शेकापच्या मनमानी कारभाराला कंटाळून के. के. म्हात्रे, रवींद्र जोशी, भाऊ भगत, रवी गोवारी, सुरेश म्हात्रे, सचिन गायकवाड, रमेश म्हात्रे, हरिश्चंद्र जोशी, लक्ष्मण पेठकर, अरुण म्हात्रे, नारायण पोपेटा, मेघनाथ म्हात्रे, शशिकांत भोपी, गणेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, किरण भेडे, जीवन भेंडे, रजित जोशी, अरुण म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, शालीग्राम चौधरी, दिलीप म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, मधुकर घरत, साईनाथ भोपी, भगवान म्हात्रे, रोशन भोपी, रोहन भोपी, हनुमान जोशी, हनुमान म्हात्रे, श्रीधर जोशी, राज जोशी, मोरेश्वर म्हात्रे, शशिकांत हिरू भोपी, नंदलाल भोपी, प्रमोद भोपी, चंद्रकांत भोपी, हरेश भोपी, स्वप्नील म्हात्रे, सुरेश म्हात्रे, राजू वानखेडे, सागर मसणे, कमलाकर चिमणे, संजय चिमणे, प्रल्हाद चिमणे, सचिन पाटील, गजानन जोशी, वाय. के. सिंग, जयकुमार डिगोळे, आशुतोष सोनावणे, शशिकांत पांडुरंग भोपी, सिद्धू कांबळे, संदीप भोगे, हनुमंत म्हात्रे, अतिष म्हात्रे, दर्शन म्हात्रे, अक्षय म्हात्रे, सदाशिव पोपेटा, मंगेश सुसवीरकर, विनायक म्हात्रे, विजय पाटील, सदानंद पोपेटा, हिरामण म्हात्रे, संदीप म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचप्रमाणे मनसेचे कामोठे शहर उपाध्यक्ष आणि वाहतूक सेनेचे माजी पनवेल तालुका उपाध्यक्ष जयकुमार डिगोले यांनीही पक्षप्रवेश केला.
एकेकाळी दिमाखात वावरणार्या शेकापला दिवसेंदिवस घरघर वाढली आहे. शेकाप नेत्यांचे स्वार्थी राजकारण आता जनतेला कळून चुकले आहे. काम असेल तेव्हा कार्यकर्त्याला गोंजारायचे आणि काम झाल्यावर त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचे नाही हा शेकापचा फंडा एव्हाना सर्वांना माहीत झाला आहे. शेकापची मतलबी वृत्ती तर जगजाहीर आहे. त्यामुळे शेकापतील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी शेकापपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे कामोठ्यातील दिग्गज नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. या अनुषंगाने ते ते समर्थकांसह भाजपत दाखल झाले. या प्रवेशामुळे पनवेलमध्ये शेकापला भगदाड पडले आहे. दुसरीकडे, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात विकासाची लाट आली आहे. त्यांची कार्यप्रणाली सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि सर्व समाजाच्या प्रगतीची आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपचा झेंडा हाती घेत आहेत. तशाचप्रकारे हा पक्षप्रवेश झाला.