Breaking News

उरण, खारघरमध्ये राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी

उरण : वार्ताहर

भाजप उरण तालुका यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस मंगळवारी (दि. 12) येथील भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका युवक अध्यक्ष शेखर पाटील, शहर युवक अध्यक्ष निलेश पाटील, हितेश शाह, अंकित म्हात्रे, हंसराज चव्हाण आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अभिवादन केले.

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय, फुंडे येथे मंगळवारी (दि.12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कृष्णाजी कडू, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, पर्यवेक्षिका आशा मांडवकर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे, सर्व शिक्षक वृंदांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सांस्कृतिक विभाग सहायक दर्शना माळी यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर कृष्णाजी कडू आणि आशा मांडवकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महिती सांगत शिक्षकांनी आपली भूमिका कशा पद्धतीने बजावली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. या वेळी विद्यालयातील माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

खारघर : रामप्रहर वृत्त

भाजप खारघर-तळोजा मंडल व युवा मोर्चाच्या यांच्या वतीने खारघरमधील भाजप जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली गेली. या कार्यक्रमात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, प्रज्ञा प्रकोष्ट संयोजक डॉ. राकेश सोमाणी होते तर भटके विमुक्त संयोजक दिलीप आडे व सरचिटणीस दीपक शिंदे यांनी विचार मांडले.

या वेळी भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड उपाध्यक्ष अमर ठाकूर, खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बीना गोगरी, प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक डॉ. राकेश सोमानी, सहसंयोजक संदीप एकबोटे, भटके विमुक्त संयोजक दिलीप आढे, युवा मोचा सरचिटणीस अमर उपाध्याय, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, सचिव पप्पू खामकर, फुलाजी ठाकूर, खजिनदार प्रमोद पाटील तसेच राजू आचरेकर, कृष्णा खडगी, सीमा खडसे, अर्जुन पाटील, अजय जाधव, सचिन चिखलकर, जितू धरमदास, किरण रावडे, अमर चौधरी, संजय पांडे, नकुल पाटील, दीपक खुडे आदी उपस्थित होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply