Breaking News

उरण येथे मोटरसायकल हेल्मेट रॅली

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

32 वे रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत उरण येथे जनजागृती व्हावी या उद्देशाने बुधवारी (दि. 20) मोटरसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलचे मोटार वाहन निरिक्षक दिनेश बागुल यांनी हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल हेल्मेट रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा (उरण) येथून सुरु होऊन पुढे शेवा, चारफाटा, द्रोणागिरी, नविनशेवा, मुलेखंड व पुढे उरण चारफाटा येथे येऊन सांगता समारोप करण्यात आला.

रॅलीमध्ये सुमारे 70 मोटरसायकल हेल्मेटस्वार यांचा सहभाग होता. या वेळी हेल्मेट विषयी मार्गदर्शन पुस्तिका व गुलाब पुष्प मोटरसायकल हेल्मेटस्वार यांना देऊन हेल्मेटचे महत्त्व पटवुन देण्यात आले.

या वेळी धनराज शिंदे, सचिन पोलादे तसेच उरण येथील श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कुल, उरण मोटार ट्रेनिंग स्कुल, श्री हरिहरेश्वर मोटार ट्रेनिंग स्कुल, श्री  गणेश मोटार ट्रेनिंग स्कुल, श्री राघोबा मोटार ट्रेनिंग स्कुलचे संस्थापक तसेच मोटार सायकल स्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply