Breaking News

भारतीय संघ दुखापतींच्या फेर्‍यात; पाच खेळाडू अनफिट

चेन्नई ः वृत्तसंस्था
भारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसर्‍या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, पण भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेर्‍यांमध्ये अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्काच असेल. परिणामी भारतीय संघासमोर आता जास्त पर्याय नसल्याचेच पाहायला मिळत आहे.  
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी लोकेश राहुलची भारतीय संघात निवड करण्यात आली होती, पण अजूनही राहुल पूर्णपणे फिट झाला नाही. त्यामुळे दुसर्‍या कसोटी सामन्यातही तो खेळू शकणार नाही. कारण दुखापतीमधून राहुल अजूनही सावरलेला नाही. राहुलसह अजून चार खेळाडूही पूर्णपणे फिट ठरलेले नाहीत. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
एका अहवालानुसार भारताचे रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे खेळाडू दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेले नाहीत. हे सर्व खेळाडू शंभर टक्के फिट नाहीत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांचा विचार करण्यात येणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात या सर्व खेळाडूंना दुखापत झाली होती, पण या दुखापतीमधून ते पूर्णपणे सावरलेले सध्याच्या घडीला तरी दिसत नाहीत.
भारतीय संघासाठी एक मोठा धक्काच असेल. कारण या खेळाडूंकडे चांगला अनुभव आहे, पण ते खेळू शकत नाहीत. त्याचबरोबर भारतीय संघाने पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे आता विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत जर त्यांना पोहचायचे असेल, तर त्यांना एकही सामना गमावून चालणार नाही. त्यामुळे अशा निर्णायक वेळेला भारताचे अनुभवी खेळाडू संघात नसणे धोक्याचे चिन्ह आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply