Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील उद्याने आणि मैदानांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कळंबोलीतील अनेक उद्याने आणि खेळाची मैदाने सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि मैदाने पनवेल महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात येणार असून, यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) कळंबोलीमधील उद्याने आणि खेळांच्या मैदानांची पाहणी केली. सिडकोच्या अंतर्गत असणारी कळंबोलीतील उद्याने आणि खेळाची मैदाने ही पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. या उद्यान आणि मैदानांमध्ये विविध सुविधा तसेच त्यांचा विकासाच्या दृष्टीकोनातून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही पाहणी केली. पाहणी दौर्‍यात परेश ठाकूर यांच्यासोबत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ब’ सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम तसेच अशोक मोटे, महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव, कमल कोठारी, प्रकाश महानवर, रामा महानवर आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply