Breaking News

गृहमंत्री देशमुखांना गुन्हेगारांचा गराडा

औरंगाबाद : प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या औरंगाबाद दौर्‍यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून, तो जेलमध्येही होता. मतीन याची एमआयएमने पक्षातून हाकालपट्टी केली आहे. कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखाकिंग म्हणून ओळख आहे, तर जफर बिल्डर हा ट्रक चोरून विकणार्‍या टोळीतील गुन्हेगार आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना देशमुख यांनी ‘मी औरंगाबादला दौर्‍यावर गेलो होतो. दौर्‍यावर गेल्यानंतर अनेक लोक भेटण्यासाठी येत असतात, पण यापुढे अवश्य दक्ष राहीन,’ असे म्हणत हात झटकले आहेत.

Check Also

श्रीगणेशोत्सव आणि मनोरंजनक्षेत्र यांच्या नात्याची गोष्ट

आजच्या श्रीगणेशोत्सवात हमखास दिसणारी फिल्मी गोष्ट म्हणजे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटीजनी …

Leave a Reply