Breaking News

कोंडले-खैरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

इम्यानुअल मरसी होम आश्रम, चिपळे यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोंडले-खैरवाडी येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या मध्ये तांदुळ, आटा, हळद, चहापावडर अशा जीवनावश्यक वस्तूंचे 150 आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आले. अध्यक्ष फादर सिनू मैथ्यू यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

या वेळी भाजप वावंजे विभागीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील, चिपळेचे माजी उपसरपंच धनंजय पाटील, गणेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply