Breaking News

काळाधोंडा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करणार -आमदार महेश बालदी

उरण  : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी काळाधोंडा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनीत भोईर, कोट ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपूत्र असलेल्या शेतकर्‍यांची कशी फसवणूक झाली ते सांगितले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन या वेळी विद्यमान आमदार महेश बालदी यांना देण्यात आले. विविध मागण्यांसाठी 8 जानेवारीपासून काळाधोंडा येथे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून प्रश्न निकाली काढणार आहे. तसेच न्यायालयीन लढ्यासाठी तयार राहण्याचे व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले. या वेळी काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपोषणाला जाहीर पाठिंबा

धरणे आंदोलन व साखळी उपोषणाच्या 36व्या दिवशी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एक लोकप्रतिनिधी म्हणून काळाधोंडा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार असल्याचे व साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे बालदी यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply