Breaking News

बारणेंच्या विजयासाठी महायुतीची नेरळ परिसरात मोर्चेबांधणी सुरू

कर्जत : बातमीदार : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी नेरळ परिसरात शिवसेना, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या नेरळ शहरातील कार्यकर्त्यांची बैठक नेरळ शिवसेना शाखेत आयोजित केली होती. त्या वेळी आरपीआयचे कोकण विभागीय सचिव मारुती गायकवाड, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, कर्जत पंचायत समितीच्या सदस्या सुजाता मनवे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष समिधा टिल्लू, मृणाल खेडकर, आरपीआय महिला तालुका अध्यक्ष सुरेखा चिकणे, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते माधव गायकवाड, भाजप तालुका कार्यालयीन चिटणीस परशुराम म्हसे, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे आदी पदाधिकार्‍यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरुवातीला शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे, भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, आरपीआय शहर अध्यक्ष बाळा संदानशिव, शिवसेना शहर संपर्कप्रमुख किसन शिंदे, उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी स्वागत केले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा नामांकन अर्ज भरणे, युतीचा प्रचार कसा असावा, महिला कार्यकर्त्यांवर  प्रचाराची जबाबदारी सोपवणे आदी विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संसदेत बोलणारा आणि सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारा, तसेच आपल्या मतदारसंघात विकासकामे करणारा आणि कायम जनसंपर्क ठेवणारा आपला उमेदवार असल्याने खासदार श्रीरंग  बारणे दुसर्‍यांदा खासदार होतील, असा विश्वास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांनी व्यक्त केला. खासदार बारणे यांनी आपल्या कार्याने गटबाजी मोडून काढली असून, त्यांचा विजय हा त्यांच्या सततच्या संपर्काने नक्की केला असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव यांनी या वेळी व्यक्त केला. माधव गायकवाड, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, आरपीआयचे कोकण संयोजक मारुती गायकवाड यांचीही या वेळी समायोचित भाषणे झाली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply