Breaking News

नवीन पनवेलमध्ये महायुतीचा जोरदार प्रचार

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार  खासदार श्रीरंग बारणे यांची प्रचारात आघाडी पाहायला मिळत आहे. रविवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल विभागात प्रचार केला. या वेळी शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरण, पनवेल आणि कर्जत या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मावळ मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. महायुतीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत, 5 वर्षे संसदरत्न मिळालेले खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. सेना-भाजप मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी रामदास शेवाळे, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, प्रतिभा भोईर, राकेश गोवारी, नवीन  रूपेश ठोंबरे, अतुल मोकल, अजय गोयजी, करण सोनावणे, विभाग संघटक संजय गोवेकर, उपविभाग संघटक बिपीन झुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply