खालापूर : प्रतिनिधी
खोपोली विणानगरमधील अंजु शंकर सरकार (रा-वास्तु अपार्टमेन्ट) कुटूंबासह पेण येथे गेल्या होत्या. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व लोखंडी कपाटातील सोन्याचे 14 ग्रॅम वजनाचे 44 हजार 800 रूपये किंमतीचे मंगळसूत्र, सोन्याची साडेतीन ग्रॅम वजनाची 11 हजार 200 रूपये किंमतीची अंगठी आणि साडेपाच ग्रॅम वजनाचे 17हजार 600 रूपये किंमतीचे झुमके असा एकूण 73 हजार 600 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी अंजु सरकार यांचा मुलगा सागर घरी आल्यानंतर त्याला दरवाजाची कडी तुटलेली दिसली. त्यानंतर त्याने खोपोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पुढील तपास हवालदार पी. आर. पाटील करीत आहेत.