हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन केले. आम्ही असा बंगाल बनवू, जो रोजगार व स्वयंरोजगाराने युक्त असेल. जिथे सर्वांचा विकास होईल. माँ, माटी आणि मानुषच्या गप्पा करणारे लोकबंगालच्या विकासासमोर भिंत बनून उभे राहिले आहेत, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल सरकारवर निशाणा साधला. बंगालमध्ये कमळ फुलणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …