Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुसर्या ट्रकला धडक; वाहनचालक ठार, दोघे गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने मुंबई-पुणे महामार्गावर वारद गावाजवळ उभ्या असलेल्या दुसर्‍या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकचा चालक टायरखाली चिरडून जागीच ठार झाला, तर ठोकर देणारा ट्रकचालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर हद्दीतील वारद गावाजवळ गुरुवारी (दि. 4) पहाटेच्या सुमारास ट्रक (केए 27-बी 4227)चा टायर पंक्चर झाल्यामुळे वाहनचालक टायर बदलत होता. त्याचवेळी महामार्गावरून भरधाव वेगात आलेल्या दुसर्‍या ट्रक (एमएच-10,सीव्ही-7868)वरील चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने पंक्चर काढत असलेल्या ट्रकला ठोकर दिली. या अपघातात पंक्चर काढत असलेला चालक टायरखाली चिरडून जागीच ठार झाला, तर ठोकर देणार्‍या ट्रकचा चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मयत व जखमींची नावे समजली नाहीत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply