Breaking News

मोफत औषधे सेवा केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यामध्ये कार्यरत असलेली जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट ही संस्था 37 वर्षांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची सेवा करीत आहे. या संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, या अंतर्गत गरीब, गरजूंना मोफत औषधे सेवा देण्यात येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले.
जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संस्थेमार्फत ‘जीवन ज्योत ड्रग बँक हे मोफत औषध वाटप केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, कच्छ युवक संघ मेडिकल कमिटी मेंबर किरीट सावला, भाजप नेते जितेंद्र वाघमारे, मॅनेजिंग ट्रस्टी हरकचंद सावला, निर्मला सावला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply