Breaking News

‘केकेआर’मध्ये रिंकू सिंहच्या जागी गुरकीरतसिंग मानला संधी

कोलकाता ः वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंहला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)च्या संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी मोसमात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू गुरकीरतसिंग मानला संघात समाविष्ट केले आहे. 30 वर्षीय पंजाबचा अष्टपैलू खेळाडू गुरकीरतने आयपीएलमध्ये एकूण 41 सामने खेळले आहेत. त्याने 2012च्या हंगामात पदार्पण केले. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. गुरकीरत पदार्पणापासून प्रत्येक हंगामात कमीत कमी दोन सामने खेळला आहे. या काळात त्याने 511 धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावताना गोलंदाजीत दोन बळी घेतले आहेत. 2018च्या आयपीएल हंगामात गुरकीरतला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply