Breaking News

मोबाइलचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम

मित्रांनो या आधुनिक डिजिटल, विकास आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो मोबाइल वापरत नसेल. एका क्षणासाठी कोणालाही मोबाइल हा स्वतः पासून दूर करायचा नाही अशी गरज बनला आहे. याच आपल्या मोबाइल वापराच्या परिणामामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची सवय आणि व्यसन लागले आहे.

जेव्हा लहान मुले रडतात तेव्हा त्यांना चूप करण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात. काही तर लहान मुलांच्या हातात मोबाइल असल्याशिवाय मुलं जेवायला बसत नाहीत. खरं तरं लहान मुलांना येथून मोबाइलची सवय लागते. पण ही सवय पुढे चालून इतकी वाढते की, मुलांवर याचे शारीरिक आणि मानसिक समस्यांचे हानिकारक परिणाम होऊ लागतात. तर या लेखामध्ये लहान मुले आणि मोबाइल या विषयावर म्हणजे मुलांवर मोबाइलमुळे होणारे परिणाम आणि मोबाइलचा अतिवापर कसा कमी करता येईल याबद्दल जाणून घेऊया…

लहान मुले मोबाइलकडे आकर्षित होण्याचे कारण लहान मुलांना कार्टून्स का आवडतात? कारण तज्ञांच्या मते सहा-महिन्यांचे बाळ वेगवेगळे चित्र आणि रंग पाहून आकर्षित होतात. यामुळेच मोबाइलकडे मुलांचा कल वाढतो. मोबाइलमधून निघणारा प्रकाश आणि त्यावर दिसणारी चित्रे मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. त्याचवेळी, मोबाइलच्या आवाजामुळे मुलांमध्ये याबद्दल जाणून घेण्यास आणि स्पर्श करण्यास उत्सुकता निर्माण होते.

लहान मुलांना मोबाइलची सवय आणि व्यसन लागण्याची कारणे

प्रेम आणि आपुलकीमुळे मुलांना मोबाइल देणे. रडणार्‍या मुलांना मोबाइल फोन देऊन त्यांचे मनोरंजन करणे. त्यांना खाण्यासाठी मोबाइल देण्याचा लोभ. मुलांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आणि मुलांना विशेष काम करण्यासाठी मोबाइल देऊन मुलांचे मनोरंजन करणे.

मुलांवर मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम

मुलांमध्ये मोबाइल फोन वापरण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत, त्यातील काही दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. मोबाइल फोनमधून निघणारी रेडिएशन बर्‍याच मुलांसाठी खूप हानिकारक मानली जाते. कारण यामुळे चिंताग्रस्त गंभीर प्रकारची समस्या उद्भवली आहेत. मुलांना लवकर चष्मा लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि कोरडेपणा यांसारख्या समस्या होत आहेत.

शारीरिक व्यसन: आपण भौतिक ऑब्जेक्टला फिजिकलॉजिकल अ‍ॅडक्शनची समस्या म्हणू शकतो. साध्या शब्दांत सांगायचे तर याला व्यसन म्हणणे चुकीचे ठरणार नाही. खरं तर, लहानपणापासूनच ज्या मुलांच्या हातात मोबाइल फोन आहेत त्यांना याची सवय लागते. यामुळे ते नेहमीच मोबाइलमध्ये व्यस्त असतात आणि त्यांना खाण्यापिण्याचा आणि झोपण्याचा होश नसतो.

मोबाइल फोनचा एक दुष्परिणाम म्हणजे मुलांचा मानसिक विकास प्रतिबंधित होऊ शकतो.  मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांचे कोणत्याही कामात लक्ष राहत नाही. त्याच वेळी, मुलं लोकांशी सामाजिक आणि व्यावहारिकदृष्ट्या संपर्क साधू शकत नाही. सांगायचे एवढेच की, मुलांच्या वयानुसार त्यांचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्यात कुठेतरी कमतरता येते.

मुले मोबाइलवर गेम खेळतात. नवीन गोष्टी पाहतात शिकतात. आजकाल तर कार्टून आणि इतर कार्यक्रम मोबाइलवरही उपलब्ध आहेत. यामध्ये अधिक रूचि असल्यामुळे मुलं रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. याच कारणामुळे मुलांना झोप न येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

मुलांनी वारंवार मोबाइल फोन वापरल्याने त्याच्या वागण्यातही बदल होऊ शकतो. तज्ञांच्या मते असे मानले जाते की, मोबाइलचे व्यसन मुलांना इतर कोणत्याही कामात लक्ष घालू देत नाही. अशा परिस्थितीत जर आपण त्याच्याकडून मोबाइल ताबडतोब घेतला तर कदाचित असे होईल की, त्यांना आपल्याप्रती नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. बर्‍याचदा ते चिडचिड करतील किंवा रागावतील. काही मुलं तर रडतील आणि जेवण पण करत नाहित.

मुलांच्या मोबाइल वापरासंदर्भात असेही पुरावे आहेत की, मुलांमध्ये मोबाईलचा अधिक वापर केल्यास राग आणि डिप्रेशन यांसारखी समस्या देखील उद्भवू शकते. बर्‍याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, मोबाईल च्या अति वापरामुळे मुलांना डोकेदुखी सारखी समस्या निर्माण होते.

आजकाल अनेक मुलांमध्ये वजन कमी होणे, लठ्ठपणा, कुपोषण यांसारख्या  समस्या वाढत आहेत.  याशिवाय, जेवण करताना फोन पाहणे आणि गेम खेळण्याच्या व्यसनामुळे अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर, हायपरॅक्टिव्हिटी आणि स्लीप डिसऑर्डरसारखे आजार मुलांच्या जवळ येत आहेत.

मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त करण्याचे मार्ग

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, आजच्या काळात मुलांना मोबाइल फोनपासून पूर्णपणे दूर ठेवता येत नाही, परंतु जर मुलांना फोनपासुन दूर करायचे असेल तर पालकांनी मुलांना इतर खेळांमध्ये व्यस्त ठेवले पाहिजे.

पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जर आईने मोबाईलसाठी किंवा इतर कशासाठी नकार दिला असेल तर वडिलांनीही नकार द्यावा. अन्यथा मुलांना माहिती होईल की आपण कोणाकडे काय मागावे.

मुलांचे इमोशनल नाटक सहन करू नका. आपल्या उत्तरात किंवा मतांमध्ये सुसंगत रहा. एका दिवशी नाही आणि दुसर्‍या दिवशी होय असे म्हणू नका. जर मुले रडायला लागल्यास, लक्ष देऊ नका. नंतर थोड्या वेळाने प्रेमाने समजावून सांगा. शक्यतो मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. कारण असे आहे की यावेळी मुलांना पालकांचे सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकीची आवश्यकता असते.

आपल्या सोबत राहिल्याने मुलं मोबाइलपासून आपोआप दूर होतील. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी मोबाइलऐवजी खेळणी वापरा. शक्य असल्यास, त्यांना काही पाळीव प्राणी आणा. कारण असं केल्याने ते मोबाइलपासून तर दूर होतीलच पण त्यांच्यामध्ये भावनिक सुधार देखील होईल. मुलांसमोर मोबाइलचा जास्तीत जास्त वापर करू नका. असे केल्याने त्यांचा मोबाइलकडे जाणारा कल आणि इच्छा कमी होईल. इंटरनेटवर काही चांगले आणि माहिती देणारे असल्यास ते पाहण्यासाठी एक वेळ सेट करा आणि बसून पहा.

आपण स्मार्ट टीव्ही वापरू शकता, यामुळे डोळे आणि स्क्रीन यांच्यामधे अंतर राहील. जगातील प्रत्येक तंत्रज्ञान किंवा डिव्हाइसप्रमाणे मोबाइलचे देखील फायदे आणि नुकसान आहेत.  आजच्या काळात, स्मार्टफोन खरोखर एक शक्तिशाली डिव्हाइस आहे आणि यामुळे मुलांना बरेच काही शिकायला मिळते, परंतु मुलांवर होणार्‍या दुष्परिणामांकडेदेखील दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. परंतु या गोष्टींच्या वापरावर संयम ठेवल्याने नक्कीच मुलांचे कल्याण आणि संपूर्ण जीवन चांगले होईल.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply