नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड दौर्यापूर्वी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. त्याने लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही विराटने केले आहे. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पत्नीसह कोरोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करीत कोरोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत. भारत-न्यूझीलंड यांच्यात साऊदम्पटन येथे 18 ते 22 जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत आणि त्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यासाठी खेळाडू लसीकरण करून घेत आहेत.