Breaking News

कृपया सुरक्षित राहा, ही वेळ निघून जाईल!; इंग्लंडच्या पीटरसनचे भारतीयांना आवाहन

इंग्लंड ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे. या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा 14वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर या स्पर्धेत खेळणारे खेळाडू आणि इतर सदस्य त्यांच्या मायदेशी परतले आहे, मात्र घरी जाऊनही काही खेळाडूंनी भारताच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करीत धीर दिला आहे. आयपीएलमध्ये समालोचन करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने भारताच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करीत थेट हिंदीतून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पीटरसनने म्हटले आहे की,मी भारत सोडला असला,  तरीही मी या देशाचा विचार करीत आहे. कारण या देशाने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सुरक्षित राहा. ही वेळ निघून जाईल, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे. पीटरसनपूर्वी इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा (आरआर) फलंदाज जोस टलरने भारताला भावनिक संदेश दिला. भारत हा एक विशेष देश आहे, जो या वेळी कठीण टप्प्यातून जात आहे. माझे आणि माझ्या कुटुंबाचे नेहमीप्रमाणे स्वागत केल्याद्दल धन्यवाद. कृपया सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या, असे बटलरने म्हटले होते.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply