
पनवेल ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महादेव गडगे, महेंद्र गोजे, हुसेन शेख, अशोक आंबेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.