Breaking News

काँग्रेसचे रवींद्र चितळे यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, काँग्रेसचे नेते रवींद्र महादेव चितळे यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. जेएनपीटी विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप विभागीय अध्यक्ष किरण माळी, माजी सरपंच विजय मुरकुटे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी, राजेश सोनावळे, राजेश कारंडे, विशाल मुरकुटे, बंडू मोडक, सुनील तुंगारे, जितेंद्र चौधरी, चंद्रकांतबुवा पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply