मतदारांशी थेट संवाद साधण्यात भाजप कार्यकर्ते यशस्वी; बारणेंच्या विजयासाठी कसली कंबर
खारघर : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराने आता चांगलाच वेग पकडला असून, मावळ मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइंचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. रविवारी खारघर येथे प्रभाग 4मधील सेक्टर 11 येथे जोरदार प्रचार करण्यात आला. या वेळी मतदारांशी थेट संवाद साधत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. या प्रचार रॅलीत खारघर भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह प्रभाग समिती ‘अ’ सभापती अभिमन्यू पाटील, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, दिलीप जाधव, नवनित माकू, उत्तमराव औधडे, निलेश पाटील, अंबालाल पटेल, नंदू दळवी, कन्नूभाई पटेल, वासुदेव पाटील, प्रभाकर चिदूराला, स्वप्नील पिसे, कुंदाताई मेंगरे, गीता चौधरी, संजना जाखड, अंकिता वारंग, मोना अडवाणी, प्रकाशराव पाठक, संदीप एकबोटे, साधना पवार, स्मिता आचार्य, आशा शेडगे, प्रतीक्षा कदम, विठ्ठल सुनारे, विपुल चोतलीया, संध्या सोनार, अश्विनी भुवड, किरण पाटील, भरत कोंटाळकर, प्रभाकर बांगर, हर्ष सोनावणे, महेश सवाखंडे, साम्या पावसकर, संजय पाचपोर, कुणालभाई संघानी, एन. के. शर्मा, भरत पटेल आदी सहभागी झाले होते. एकूणच राजकीय वातावरणाला आता चांगलाच रंग चढू लागल्याने ऐन कडक उन्हात खारघरचे राजकीय वातावरण चांगलेच तप्त झाले आहे. त्याची चित्रमय झलक.
खासदार म्हणून बारणेच पुन्हा निवडून येणार -अॅड. जगताप
उरण : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या रक्तात शिवसेना आहे. ते काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे भ्रष्टाचारी नाहीत. त्यामुळे 2014 साली खासदार झाले. आताही पुन्हा खासदार म्हणून श्रीरंग बारणेच निवडून येतील, असे प्रतिपादन ग्राहक कक्षाचे सरचिटणीस अॅड. अरुण जगताप यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत मार्गदर्शन करताना केले. ते पुढे म्हणाले की, विकास घडवून आणण्यासाठी त्यांना निवडून द्या. शिवसेनेचा प्रचार जोमाने करा. कारण आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांना व उद्धवजींना डोळ्यांसमोर ठेवतो. मग कितीही थकवा आला तरी आम्हाला काम करायला शक्ती मिळते. आपण सर्वांनीच निश्चय केला तर आपले सरकार नक्की येणार, असा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला, तसेच सुधागडमधील मतदार अनंत गीते यांना निवडून देतील, असा विश्वास वरिष्ठांना दिला. या वेळी कर्जत नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, कार्यकारिणी सदस्य सुनील बागवे, कल्पेश व्यास, कक्ष जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, कक्ष उपजिल्हा प्रमुख ऐहतेशाम पेनवाला, नगरसेवक संकेत भासे, मनू डांढेकर, प्राची डेरवणकर, संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णाजी कदम, कक्ष तालुकाप्रमुख किरण हाडप, उमेश सावंत, किरण तावजरे, गजानन माळी, समीर मुलानी, श्याम घारे यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआय युतीचे व ग्राहक कक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पळस्पे जि. प. मतदारसंघात प्रचार
पनवेल : लोकसभा निवडणूक 2019 पळस्पे जिल्हा परिषद विभागात ग्रामपंचायत बेलवलीत हालटेप, तरतेप, ठाकूरवाडीत मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा प्रचार करताना भाजप पदाधिकारी अनेश ढवळे, अजय तेजे, योगेश लहाने, जगदीश केंगे, पांडू वरगडा आदी.
भाजपच्या भक्कम पाठिंब्याने श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली
उरण : रामप्रहर वृत्त : दोन दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात दिलजमाई झाली, तसेच उरण आणि पनवेल मतदारसंघातून बारणेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले आहे. या दोन्ही आमदारांची साथ, मोदी फॅक्टर आणि आतापर्यंत बारणे यांनी उरण, पनवेल, कर्जत या ठिकाणी केलेली कामे यामुळे नक्कीच युतीच्या उमेदवाराचे पारडे जड असून त्यांची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे शेकापवर राष्ट्रवादीची मदार आहे, पण उरण आणि पनवेल मतदारसंघातून श्रीरंग बारणेंना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देऊ, असे भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची चर्चा होते, त्यावेळी फक्त पिंपरी-चिंचवड आणि मावळ या तीन मतदारसंघाची चर्चा होते, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अजूनही तीन तालुके आहेत, ज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचे प्राबल्य आहे. पनवेल आणि उरण या मतदारसंघांमधून युतीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देऊ, असे आ. प्रशांत ठाकूर म्हणाले. यासोबतच संपूर्ण मतदारसंघात मोदी फॅक्टरचा फायदा युतीच्या उमेदवारास होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. यासोबतच 10 वर्षांपासूनचे हाडवैरी असलेले आप्पा-भाऊ यांच्या मनोमीलनामुळे मावळचे उमेदवार बारणे यांचे वजन वाढले आहे. चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले असून, त्यानुसार काही नगरसेवक कामाला लागलेत. याचाच प्रत्यय म्हणजे बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी आणि एकत्रित आलेली नेतेमंडळी आहे. बारणेंचा फॉर्म भरण्यापूर्वी भव्य रॅली काढत माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. लक्ष्मण जगताप, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, बापू सूत्रे, बाळा भेगडे, नीलम गोर्हे आदी सहभागी झाले होते. त्यामुळे बारणे यांची ताकद वाढून शिवसेना-भाजपचा जोरदार प्रचार सुरू झाला असून, बारणे यांच्या अडचणी दूर झाल्याने प्रचारातील रंगत वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.
करंजाडेत महायुतीचा प्रचार
पनवेल ः मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ करंजाडे आणि नेवाळी येथे रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते.