Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वाचनालय आणि रिक्षाथांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय व रिक्षाथांबा सुरू करण्यात आला आहे. हे वाचनालय व रिक्षाथांबा स्व. मधुशेठ भगत, स्व. राहुल पाटील व स्व. राकेश पाटील यांच्या स्मरणार्थ आणि सिमरन गु्रपचे अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे. या वाचनालय व रिक्षाथांब्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 14) महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन पनवेल येथील बालाजी मंदिराजवळ सार्वजनिक वाचनालय आणि रिक्षाथांबा सुरू करण्यात आला आहे. उद्घाटनाच्या वेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, भाजप नेते जगदिश घरत आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply