Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अ‍ॅपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उलवे नोड येथे सेवाभावी डॉक्टरांनी अ‍ॅपेक्स हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
उलवे नोड येथे डॉ. विजय घोरपडे, डॉ. मयुरी घोरपडे, डॉ. निखिल वर्गे या सेवाभावी डॉक्टरांनी अ‍ॅपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उलवे नोडमध्ये वहाळ, उलवे, गव्हाण परिसरातील तसेच ठाणे, मुंबई परिसरात नोकरीस असणार्‍या नागरिकांना चांगल्या व माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
तसेच ग्रामीण भागातील 50 टक्के रुग्ण उलवे नोडमध्ये असून त्या ठिकाणी आठ कोविड केअर सेंटर्स सुरू झाल्यामुळे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी समाधान व्यक्त करीत शासन स्तरावर सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष भाजप नेते संदीप पाटील, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, वहाळचे तंटामुक्ती अध्यक्ष सीताराम नाईक, बामणडोंगरी स्कूल कमिटी चेअरमन संजय नाईक, भाजप कार्यकर्ते अंकुश ठाकूर, विठ्ठल ओवळेकर, गणेश पाटील, कैलास गोंधळी आदी  उपस्थित होते.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply