Breaking News

खोपोली भाजपतर्फे आदिवासींना मदतीचा हात

खोपोली ः प्रतिनिधी

केंद्रातील मोदी सरकारला 31 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रविवारी (दि. 30) खोपोली भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांना अन्नधान्य, मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.

या वेळी सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्राप्पा अनिवार, रमेश रेट्रेकर, चिटणीस स्वाती बिवरे, गोपाळ बावस्कर, सुनीता पाटणकर, सुमिता महर्षी, शक्तिप्रमुख संजय म्हात्रे, राहुल जाधव, राकेश दबके, कीर्ती ओसवाल, जिल्हा सदस्य विजय तेंडुलकर, स्नेहल सावंत, युवा मोर्चा प्रमुख अजय इंगुलकर, विकास खुरपुडे, पुनीत तन्ना, श्री. वाघ, श्याम करणसिंघ, करण यादव आदी उपस्थित होते. या वेळी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती देताना या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply