Breaking News

सागमळा येथे भीषण आग; शिवकालीन शस्त्रे, व्यायामशाळा भस्मसात

रेवदंडा : प्रतिनिधी

श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या सागमाळा येथील व्यायामशाळेत शॉकसर्किटने आग लागली. त्यात व्यायामशाळा, मल्लखांब व शिवकालीन शस्त्रे भस्मसात होऊन मोठे नुकसान झाले. व्यायामशाळेशेजारी राहणारे विनोद ठाकूर यांना सकाळी व्यायामशाळेतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ व्यायामशाळेचे मालक शिरिष नाईक यांना त्याची माहिती दिली. नाईक  घटनास्थळी पोहोचेपर्यत व्यायामशाळेच्या आतील भागात आग पसरली होती. ग्रामस्थांनी प्रयत्नाची शिकस्त करून आग आटोक्यात आणली. या आगीत व्यायामशाळेतील चार लाख रूपये किमंतीचे 45 मॅट, तीन कॅश मॅट, 55 हजार रुपये किमतीचे चार मल्लखांब, तीस हजार रुपये किमतीचे 10 रोप मल्लखांब, व पन्नास हजार रूपये किमंतीची शिवकालीन शस्त्रे असे एकूण 11 लाख 35 हजार रुपये किमतीचा ऐवज भस्मसात झाला असल्याचे शिरिष नाईक यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास महिला  सहाय्यक फौजदार गोसावी करीत आहेत.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply