Breaking News

महायुतीच्या तोफा धडाडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पेणमध्ये

पेण : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. 18) पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या सभेस केंद्रीय मंत्री व उमेदवार अनंत गीते, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी दिली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सभेस हजर राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply