Breaking News

युरो कपमधील बाद फेरीचे चित्र स्पष्ट

पॅरिस ः वृत्तसंस्था
युरो कप 2020 स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज झाले आहेत. या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत.
साखळी फेरीत एकही सामना न गमवणार्‍या इटली, बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स, डेन्मार्क, चेक रिपब्लिक, क्रोएशिया, स्पेन, इंग्लंड आणि स्वीडन संघांनी बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. मग साखळी फेरीत रंगलेल्या खडतर अशा फ गटातून बाद फेरीत कोणता संघ हजेरी लावतो याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी हे दोन्ही सामने बरोबरीत सुटले. शेवटच्या क्षणांपर्यंत चारही संघ
विजयी गोल मारण्यासाठी धडपड करताना दिसले. अखेर त्यांना अपयश आल्याने सामने बरोबरीत सुटले. या गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगाल संघाची बाद फेरीत वर्णी लागली.

बाद फेरीतील सामने

  • वेल्स विरुद्ध डेन्मार्क (26 जून, रात्री 9.30 वाजता)
  • इटली विरुद्ध ऑस्ट्रिया (27 जून, मध्यरात्री 12.30 वाजता)
  • नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक (27 जून, रात्री 9.30 वाजता)
  • बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल (28 जून, मध्यरात्री 12.30 वाजता)
  • क्रोएशिया विरुद्ध स्पेन (28 जून, रात्री 9.30 वाजता)
  • फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड (29 जून, मध्यरात्री 12.30 वाजता)
  • इंग्लंड विरुद्ध जर्मनी (29 जून, रात्री 9.30 वाजता)
  • स्वीडन विरुद्ध युक्रेन (30 जून, मध्यरात्री 12.30 वाजता)

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply