Breaking News

पावसाळी अधिवेशनासाठी ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी मुंबई येथील विधान भवनात होणार असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरिता कोविड-19 संदर्भात आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांच्या वाहनांचे चालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी अशा सर्वांनी सोयीच्या ठिकाणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये 3 किंवा 4 जुलै या निर्धारित वैध कालावधीसाठीची आरटी-पीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल विधान भवन प्रवेशासाठी सोबत ठेवणे आवश्यक असेल. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनासुद्धा ही चाचणी इतरांच्या सुरक्षिततेसाठी करणे अत्यावश्यक असल्याचे मत या बैठकीत नोंदविण्यात आले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply