Breaking News

विवेक पाटलांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

न्यायालयीन कोठडीत वाढ

पनवेल : कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. घोटाळेबाज विवेक पाटलांच्या न्यायालयीन कोठडीत सुमारे 10 दिवसांची वाढ झाल्याचे सूत्रांकडून समजते. 500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जूनला पनवेलमधील राहत्या घरातून अटक केली होती. काही दिवस ते ईडीच्या कोठडीत होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून तुरुंगाची हवा खात आहेत. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी (दि. 12) न्यायालयात हजर करण्यात आले होते, मात्र त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply